क्षणिक वासना आणि नात्यांची राख
आजची धावपळीची, आकर्षणांनी भरलेली आणि डिजिटल संपर्कांनी वेढलेली दुनिया...
सगळं काही "क्लिकमध्ये" मिळतं – मग ते खरे प्रेम असो की खोटं सुख.
नातं आता "फीलिंग्स" वर नाही, तर "मोमेंट्स" वर आधारलेलं दिसतं.
आणि या क्षणिक मोहमायेत गुंतलेली असते... एक "वासना" नावाची नशा.
तिचा नजरा, त्याचं शरीर, एकांत जागा, थोडा वेळ, थोडी गरज...
बस! तिथं कुठेच नसत "भावना", "दायित्व" आणि "भविष्य".
अनैतिक संबंध हे नातं नसतच.
ते असतं – गरज पूर्ण करून परस्पर विसरण्याचं करारनामा.
पहिल्यांदा आकर्षण वाटतं, मग सवय लागते आणि शेवटी त्या सवयीचं व्यसन होतं.
तेव्हा प्रेमाची जागा घेतो मोह... आणि शेवटी मोहाची जागा घेतं पश्चातापाचं रडगाणं.
एकमेकांच्या शरीरात 'सुख' शोधणारे, आयुष्यभर 'शांती'पासून दूर राहतात.
कारण जे नातं फक्त शरीरावर उभं असतं, त्यात आत्मा कधीच गुंतत नाही.
कधी कधी वाटतं —
एका क्षणासाठी एखादी व्यक्ती आयुष्याचा विश्वास तोडून जाते.
त्या "क्षणात" सगळं मिळतं… पण आयुष्यभराचं "हरवतं".
म्हणूनच… भावनांचा सन्मान करा, शरीराचा व्यापार करू नका.
प्रेमात नातं असावं, पण नात्यात वासना नसावी.
मोहात नाही, विश्वासात जगता येतं.
अनुरोध आहे — नका अडकू अनैतिक संबंधात.
ते फक्त क्षण पुरते असतात… पण परिणाम आयुष्यभराचे!
#मोहाचीछाया #प्रेमकीवासना #समाजआरसा #अनैतिकसंबंध #वासनेपलीकडे #नात्यांचीतूट #भावनांचा_सन्मान #मराठीवास्तव #realisticmarathistory #socialmirror #marathiquotes #instamarathi
Comments
Post a Comment